अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर जिल्हा विभाजन ही काळाची गरज असून उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेर करावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भानुदास डेरे यांनी केली.
हे पण वाचा ; प्राजक्त तनपुरे म्हणाले मला मी पुन्हा येईल म्हणायची भिती वाटते…
पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप युवा माेर्चाचे अध्यक्ष श्रीराज डेरे या वेळी उपस्थित होते.
हे पण वाचा ; विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकारणातील धक्कादायक माहिती समोर
डॉ. डेरे म्हणाले, महत्त्वाच्या महसूल खात्याची जबाबदारी बाळासाहेब थोरातांना दुसऱ्यांदा मिळाली आहे. तालुक्याच्या विकासाकरिता संगमनेर जिल्हा झाला पाहिजे, यासाठी त्यांनी आपले राजकीय वजन वापरावे.
हे पण वाचा ; अहमदनगर जिल्ह्यातील हा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर ?
संगमनेर हे भौगोलिक, आर्थिक, तसेच सर्वार्थाने योग्य आहे. संगमनेर हे मध्यवर्ती असून जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. उद्योग, व्यापारातही संगमनेर अव्वल आहे.
हे पण वाचा ; नौकरी अपडेट्स : सारस्वत बँकेत 100 जागांसाठी भरती
अकोल्याच्या दुर्गम भागातील आदिवासी जनतेला जवळचे, तसेच साकूरसारख्या पठार भागातील लोकांना सोयीचे असणारे संगमनेर प्रशासकीय कामकाजासाठी अनुकूल आहे.
हे पण वाचा ; अहमदनगर ब्रेकिंग : आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला
संगमनेरला दळणवळणाच्या सर्व सोयी उपलब्ध आहेत. नव्याने झालेले शिर्डी विमानतळ अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहे. संगमनेरला एमआयडीसी व्हावी, यासाठी थोरातांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
हे पण वाचा ; शेतकऱ्याच्या मुलीचे यश… विक्रीकर निरीक्षक परीक्षेत पहिला नंबर !
संगमनेर जिल्हा व्हावा, यासाठी गेल्या ३० वर्षांपासून जिल्हा मागणी कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला डॉ. डेरेंच्या वक्तव्याने पुन्हा उभारी येण्याची शक्यता आहे.