अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्या रोहिणी काटे यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
त्यांचे पती संतोष काटे यांनीही रांधे गावच्या उपसपंचपदाचा राजीनामा दिला असून आगामी पंचायत समिती सभापतीपदासाठी तो दबातंत्राचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.
पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी चार व काँग्रेसचे दोन सदस्य आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे पंचायत समितीमध्ये बहुमत असून सभापती व उपसभापतिपदावर दोन्ही पक्षांचे उमेदवार विजयी होतील, अशी स्थिती आहे.
परंतु सभापतिपद खुले असल्याने या पदासाठी घोडेबाजार सुरू झाला असून राष्ट्रवादी व शिवसेनेचे या पदावर आपला हक्क सांगितला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार माजी सभापती व विद्यमान सदस्य गणेश शेळके यांनी या पदावर पुन्हा विराजमान होण्यासाठी काही सदस्यांना गळाला लावले असून काटे यांचे राजीनामासत्रही त्याचाच भाग असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.