सत्यजित तांबे म्हणाले चांगला माणूस गेला…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोड यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. आजारपणाच्या कारणामुळे त्यांच्यावर काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

उपचार सुरू असताना आज बुधवारी पहाटे च्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत माळवली.राठोड यांच्या निधनाने जिल्ह्यातील शिवसैनिकांसह जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांना मोठा धक्का बसला आहे. सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “अनिलभैय्या राठोड आयुष्यभर मा. शिवसेनाप्रमुखांचे निष्ठावान सैनिक राहिले. चांगला माणूस गेला, भावपूर्ण श्रध्दांजली !” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान अनिल राठोड हे नगर विधानसभा मतदार संघातून गेले 25 वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी युतीच्या काळात मंत्रिमंडळात त्यांचा सामावेश होता. त्यांच्या निधनाने नगरमधील शिवसेना शोकमग्न झाली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts