अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : सध्या राज्यात पारनेर मधील नगरसेवकांचा शिवसेनेतून राष्टवादी कॉंग्रेस मध्ये केलेला प्रवेश चांगलाच गाजत आहे, याबबत शरद पवार यांनी आपले मत मांडले आहे.
पारनेर हा फार लहान प्रश्न आहे. तो काही राज्यस्तरावर परिणाम करणार प्रश्न नाही, असं विधान शरद पवार यांनी पुण्यात केले आहे.
त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामावर समाधानी असल्याचे स्पष्ट केले. पारनेरमध्ये नगरसेवक फोडल्याचा मुद्दा छोटा आहे. मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला, कोरोनाच्या संकटाने तिजोरीवर आघात केला आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
विरोधकांचं टीका करण्याचं काम आहे, मुख्यमंत्र्यांचं काम दिसत आहे, मात्र कोरोनामुळे प्राधान्य बदलले आहे, 14 ते पंधरा तास बैठक होतात, यावेळी टीका करु नये,असेही पवार म्हणालेत.
पवार यांची मंगळवारी पुण्यात व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पवार पवार बोलत होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले कोरोना संकट अस्वस्थ करणारे आहे, चिंताजनक आहे. परिस्थिती पालकमंत्री आणि अधिकारी, सरकार यांच्या कानावर घालून जागेची माहिती घेऊ. ही मागणी महत्वाची असून सर्व मदत सरकार करेल, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे, नाराजी आहे, हे सगळं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही माझ्या ज्ञानात भर घातली त्यासाठी धन्यवाद, असा माध्यमांना चिमटा काढत महाविकास आघाडीत एकवाक्यता असल्याचे पवार यांनी ठामपणे सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews