महाराष्ट्र

Share Market News : आज गुंतवणूकदार होणार श्रीमंत, फक्त या 7 कंपन्यांच्या शेअरवर ठेवा लक्ष; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Share Market News : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुमच्यासाठी अशा 7 कंपन्यांच्या शेअरबद्दल सांगणार आहे ज्या तुम्हाला आज खूप पैसे कमवून देतील.

दरम्यान, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी गेले 3 ट्रेडिंग दिवस अत्यंत खराब राहिले आहेत. या काळात अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. आज 7 कंपन्या चांगले काम करू शकतात.

बुधवारी NSE 41 अंकांनी घसरून 17618 वर बंद झाला आणि सेन्सेक्स 159 अंकांनी घसरून 59,567 वर बंद झाला. त्यामुळे आज बाजाराचा कल कसा असेल? तसेच कोणते स्टॉक अधिक चांगली कामगिरी करू शकतात. याबद्दल तुम्ही जाणून घ्या.

आज बाजाराची कामगिरी कशी होऊ शकते?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे तांत्रिक संशोधन विश्लेषक नागराज शेट्टी म्हणतात की, निफ्टीतील घसरणीचा कल कायम राहू शकतो. पुढील काही सत्रांमध्ये निफ्टी आणखी घसरण्याची शक्यता आहे. बाउन्स बॅक होण्यापूर्वी बाजार 17600 ते 17500 पातळीच्या जवळ व्यवहार करू शकतो.

कोणत्या कंपन्या आज गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या ठरतील.

शेअर बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या वेगवेगळ्या तज्ज्ञांचे मत आहे की, आजच्या घडीला १०० कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 7 कंपन्या?

1- सुमित बगाडिया यांचा स्टॉक

— व्होल्टास — लक्ष्य किंमत रु 870 ते रु 880, स्टॉप लॉस रु 830 प्रति शेअर
— पॉलीकॅब – लक्ष्य शेअर किंमत रु. 3200 ते रु. 3225, स्टॉप लॉस – रु. 3080 प्रति शेअर

2- अनुज गुप्ता यांचा स्टॉक

— टाटा स्टील — लक्ष्य किंमत – रु. 116 प्रति शेअर, स्टॉप लॉस – रु 103 प्रति शेअर

3- जिगर पटेल यांचा स्टॉक

— रिलायन्स इंडस्ट्रीज – खरेदी दर – रु 2352, लक्ष्य किंमत – रु 2385 प्रति शेअर आणि स्टॉप लॉस – रु 2325 प्रति शेअर
— रॅडिको खेतान – खरेदी दर – रु. 1098, लक्ष्य किंमत – रु. 1125 आणि स्टॉप लॉस – रु. 1082 प्रति शेअर.

4- राजेश भोसले यांचा स्टॉक

— लेमन ट्री – खरेदी दर – रु 83, लक्ष्य किंमत – रु 90 आणि स्टॉप लॉस – रु 79 प्रति शेअर
— ऍक्सिस बँक — खरेदी दर रु 873, लक्ष्य रु 904 प्रति शेअर आणि स्टॉप लॉस रु 857

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts