Maharashtra news:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आज बहुमत जिंकले. त्यानंतर राजकीय टोलेबाजी सुरू असतानाच शिंदे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे.
राज्य सरकारकडून पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे आता राज्यात इंधन स्वस्त होणार आहे.बहुमत ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले.
इतर मुद्दे मांडत असतानाच त्यांनी ही घोषणा केली. केंद्रानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी केला होता, पण महाराष्ट्राने केला नव्हता. आता नवे सरकार लवकारत लवकर तो निर्णय घेईल, असे शिंदे यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे आता महाराष्टातही इंधन स्वस्त होणार आहे.