महाराष्ट्र

शिवसेना कुणाची? ‘आरपीआय’च्या फुटीचा दाखला देत आठवले म्हणाले..

Maharashtra Politics:खरी शिवसेना कोणाची यासंबंधी रिपब्लिकन नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक भाकित वर्तविले आहे. त्यासाठी त्यांनी रिपब्लिकन पक्ष फुटीच्या वेळचा संदर्भ दिला आहे.

आठवले म्हणाले, शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मोठ्या प्रमाणावर आमदार, खासदार हे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत. शिवसेनेकडे केवळ दोन चार खासदार आणि काही आमदार आहेत.

त्यामुळे शिंदे गट हीच खरी शिवसेना असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग देऊ शकतो. अशीच फूट यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये पडली होती. त्यावेळी गवई, कवाडे आणि मी वेगवेगळ्या बाजूला गेलो होतो.

गवई गटाकडे दोन खासदार असल्याने पक्षचिन्ह त्यांना मिळाले होते. बाकी सर्व पक्ष माझ्या बाजूला होता. त्यानुसार धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडे राहील,

असे भाकित रामदास आठवले यांनी वर्तवले आहे. भाजप मित्रपक्ष संपवतेय, यात तथ्य नाही, माझा पक्ष वाढतोय, मला तसा अनुभव आला नाही, असेही आठवले म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts