Narendra Modi :गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीचा तपास करणाऱ्या गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने धक्कादायक खुलासा केला आहे.
तेथील सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी कट आखला होता, अशी माहिती तपासात पुढे आल्याचे पथकाने म्हटले आहे.
तत्कालीन सरकारी अधिकारी आर. बी. श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांनी तिस्ता यांच्यासाठी खोटी कागदपत्रं तयार केली आणि नंतर त्यांचा अधिकृत कागदपत्रांमध्ये समावेश केला, असाही आरोप करण्यात आला आहे.
सेटलवाड यांच्यासह तिघांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे, त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल १०० पानांचे दोषारोप पत्र सादर केले आहे.
निवृत्त पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार आणि माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनी बनावट पुरावे सादर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दंगल पीडितांची फसवणूक करून त्यांची खोट्या कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या.
तिस्ता सेटलवाड यांनी पीडितांना मदत केली. आरोपींना नरेंद्र मोदींची राजकीय कारकिर्द संपवायची होती आणि त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवायचा होता. खोटी कागदपत्रं आणि प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी वकिलांची एक फौजच त्यांनी तयार केली होती, असा दावा त्यामध्ये करण्यात आला आहे.