धक्कादायक : महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :महापालिकेतील नगररचना विभागातील कर्मचाऱ्यासह एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली. महापालिकेत कोरोनाने प्रवेश केल्याने अनेकजण धास्तावले आहेत.

आरोग्य विभागाने थेट संपर्कात आलेल्या १४ जणांना तपासणीसाठी पाठवले आहे. शहरभर कोरोना झपाट्याने वाढत असताना महापालिकेत कोरोनाने शिरकाव केला नव्हता.

गुरुवारी प्रथमच मनपातील दोन कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याचे समोर आले. त्यात नगररचनातील एका व एका स्वच्छता कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

डॉ. सतीश राजूरकर यांनी संबंधित इमारत निर्जंतूक करण्याचे निर्देश दिले. नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांच्या थेट संपर्कात सात जण, तर स्वच्छता कर्मचाऱ्याच्या संपर्कात नऊ जण आल्याचे समोर आले. त्यांना तपासणीसाठी पाठवण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts