अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ना पोलिसांचा फौजफाटा, ना त्यांचा बंदोबस्त, ना विविध खात्याचे अधिकारी, ना हातात डायरी घेतलेला कुणीही स्वीय सहायक अशा पद्धतीने मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी थेट मोटारसायकने जात लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या जनतेच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या सोडवल्या.
मंत्री गडाख यांनी सोनई येथील खरवंडी रस्त्यावरील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीला दुचाकीने जात भेट दिली. तेथे कोरोना व्हायरसची माहिती देत घ्यावयाची प्रतिबंधात्मक काळजी समजावून सांगत लोकांच्या अडचणी समजावून घेतल्या.
संकटावर आपण सर्व मात करू, मी आपल्या सर्वांसोबत आहे, असा धीर दिला. मंत्री गडाख यांच्या साधेपणाचे ग्रामस्थांनी, नागरिकांनी कौतुक केले आहे. नामदेव सावंत, मोहन शेगर, साहेबराव शिंदे, भागाबाई सावंत, रुपाबाई शिंदे यांनी बंदमुळे उपासमार सुरू असल्याचे सांगितले.
त्यावर मंत्री गडाख यांनी भोजनाची व्यवस्था होईल, असे सांगितले. त्या प्रमाणे व्यवस्थाही करण्यात आली. मागील आठवड्यात गडाखांनी स्वत:चा बंदोबस्त नाकारून हा बंदोबस्त कोरोना प्रतिबंधासाठी वापरावा, असा अगळा निर्णय घेतला होता.
ग्रामस्थ नामदेव सावंत म्हणाले, मंत्री गडाख यांनी भेट दिल्याने मोठा धीर आला. त्यांना आमच्या रेशनकार्ड, रस्ता, पाण्याची समस्या सांगितली. त्यांनी हे प्रश्न लवकर मार्गी लागतील, असे सांगितले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com