३ जानेवारी २०२५ तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मागील वर्षभरात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.मंदिर संस्थानच्या तिजोरीत विविध माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मागील एक वर्षात एकूण ४७ कोटी २७ लाख ३२,२०६ रुपयांचे दान जमा झाले आहे.
श्री तुळजाभवानी भक्तांच्या एकूण संख्येपैकी सर्वाधिक गर्दी ही श्रवण मास ते दीपावली या कालावधीत झाली.साडे तीन शक्तिपीठापैकी एक संपूर्ण आद्य शक्तीपीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला वर्षभरात कोट्यवधी भाविक येत असून यामध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, गोवा आदी राज्यातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते.
कोरोना नंतर श्री तुळजाभवानी धार्मिक देवस्थानचे महत्त्व जगभर पोहोचल्यामुळे भक्त संख्याही कोटीच्या वर पोहोचली आहे. देवस्थान समितीने प्रसिद्ध
केलेल्या माहितीनुसार दि.१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत अंदाजे दीड कोटी २५ लाख भाविक श्री तुळजाभवानी चरणी लीन झाले आहेत.
केवळ दर्शनच नाही तर यातील हजारो भाविकांनी श्री तुळजाभवानी मातेला भरभरून दान अर्पण केले.दि.३० डिसेंबरपर्यंत जमा झालेल्या देणगी, दानाची देवस्थान समितीने मोजदाद केली आहे.यामध्ये एकूण ४७ कोटी २७ लाख ३२ हजार २०६ रुपये इतके उत्पन्न मिळाले.
देणगीनिहाय जमा झालेली रक्कम
देणगी दर्शन १६, ९६,४१,२०० रुपये
सिंहासन पेटी १२,६१,९०,२२० रुपये
दानपेटी – ६,६४,६४,८७० रुपये
विश्वस्त निधी उत्पन्न ३,६३,९१,९३८ रुपये
देणगी दर्शन (युपीआय) २,९५,७०,७११ रुपये
भरती परिक्षा फीस – ९०, ८६, ८०० रुपये
धनादेश देणगी ७२,०९,१७५ रुपये
ऑनलाईन देणगी ६४,०६,४९१ रुपये
अभिषेक पूजा फिस ५६,६५,१८०.४४ रुपये
गुप्तदान पेटी ४९,०४,०८० रुपये
ऑनलाईन देणगी आयसीआयसीआय बँक ३१,०४,१७५ रुपये
ऑनलाईन देणगी इतर बँक खाते १९,४७,७१८ रुपये
सिंहासन श्रीखंड पूजा १८, २५,८२४ रुपये
मनीऑर्डरद्वारे ८,५७,४०५ रुपये
डोळे, टीळे, कवडी व इतरद्वारे ३,०१,५०० रुपये
गोंधळ, लमाण, जावळ कट्टा- २.५१,१३० रुपये
नगद अर्पण २,११,३४४ रुपये
आराधी फिस १,६१,११७ रुपये
फोटो सेल १.४६,४४२ रुपये
तांबे, पितळ, वस्तु अर्पण ७५,५६२.५० रुपये
प्राणी अर्पण ६२,८४० रुपये
शिधा ४१,६९० रुपये
सिंहासन दही २७,०३० रूपये
निवासस्थान भाडे १६,६३१ रुपये
कल्लोळ स्वच्छता १४,०५० रुपये
इतर बाबीचे उत्पन ४७,२७,३२,२०६ रुपये