अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- सोहळा मीडियावर आजकाल तरुणाईसह उर्ध् देखील चांगलेच सक्रिय असतात. यातच सध्या लाईक्स, कमेंट मिळविणे याची स्पर्धा सुरु झालेली आहे. फॉलोवर्स वाढविणे यासाठी युझर्स आता काही एक करू लागले आहे.
असाच एक धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड मध्ये घडला आहे. यामुळे एकावर पोलिसांनी कारवाई देशील केली आहे. लेडी डॉन थेरगाव क्विनसध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
शिवीगाळ करून व्हिडीओ तयार केल्याप्रकरणी तिला आधी अटक करण्यात आली आहे. या तरूणीनं सोशल मीडियावर लेडी डॉन थेरगाव नावानं सोशल मीडियावर अकाऊंट तयार केलं.
या १८ वर्षीय तरूणीचं मूळ नाव साक्षी हेमंत श्रीश्रीमल असं आहे. साक्षी तिच्या साथीदारांच्या मदतीने इंस्टाग्रामवर अश्लील भाषेत धमकीचे अनेक व्हिडीओ पोस्ट करत होती.
तिच्या व्हिडीओला प्रचंड व्हिव्हज आणि कमेंट्सही असायच्या. या तरूणीचे इंस्टाग्रामवर ११ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
मित्रांच्या मदतीने मिळून इन्स्टाग्रामवर अश्लील भाषेत, वादग्रस्त धमकीचे अनेक व्हिडीओ तयार केले इतकंच नाहीतर मुलींना बलात्काराच्या धमकी देणारे व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता.
त्यामुळे घटनेचं गांभिर्य लक्षात घेत पोलिसांनी या तरूणीचा शोध घेऊन तिला अटक केली. पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस स्टेशनमध्ये साक्षी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लाईक्सच्या लोभापोटी तिनं असे व्हिडीओज बनवल्याचं पोलिस तपासात समोर आलं.