ST Concession : सर्व महिला वर्गाचे लक्ष लागलेल्या एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय आजपासून लागू होणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली होती. यामुळे महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. आता
एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत मिळणार आहे. या आदेशाचा जीआर निघाला असून आज एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. घोषणा केल्यानंतर काही महिलांनी याबाबत बसमध्ये विचारणा केली होती. याबाबत व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते.
दरम्यान, आता एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळांकडून 30 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत. यामध्ये वेगवेगळ्या आधारे सवलत देण्यात येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. यामुळे याचा प्रवाशांना मोठा फायदा होतो.
या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते. दरम्यान, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अधिवेशनात अनेक घोषणा केल्या होत्या. यामध्ये सर्व घटकांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत.