ST News : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर स्वच्छता पंधरवडा सुरू असतानाच एसटी आगार, एसटी बस स्थानके, बसेसची स्वच्छता महामंडळाकडून करण्यात येत आहे.
नुकतेच एसटी महामंडळाकडून एसटी चालकांनी केबिनमध्ये न थुंकण्याच्या सूचना केल्या आहेत. कोणी चालक आढळल्यास त्यांना ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
एसटी चालकांमध्ये गुटखा, तंबाखू खाऊन थुंकण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच प्रवासावेळी खाऊन थुंकण्याचे प्रकारही आढळून आले आहेत. सर्वत्र स्वच्छता राखण्यात येत असताना एसटी महामंडळाकडून देखील आगार, बसस्थानके, शौचालये, बसेस स्वच्छ करण्यात येत आहेत.
प्रवाशांप्रमणे चालकांना देखील समान नियम यानुसार एसटी महामंडळाने बसेसच्या केबिनमध्ये थुंकू नका, अशा सूचना केल्या आहेत. तसेच असे करताना आढळल्यास कार्यरत चालकाला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचा इशारा एसटी महामंडळाकडून देण्यात आला आहे.