महाराष्ट्र

MSRTC News : एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार महागाई भत्ता

MSRTC News : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना ३८ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी घेतला.

गणेशोत्सवाच्या तोंडावर चार टक्क्यांनी भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे बाप्पा पावल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, अशी मागणी करत होते. ती पूर्ण करत महागाई भत्त्यामध्ये आता चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली.

शासन आदेशानुसार, १ जुलै २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के होईल.

तसेच असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना २०३ टक्क्यांवरून वाढवून २१२ टक्के महागाई कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

तर राज्य शासनाच्या तिजोरीवर १९ कोटी रुपयांचा बोजा यामुळे पडणार असल्याचे राज्य शासनाचे म्हणणे आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या संपानंतर राज्य सरकारने त्यांच्या पगारामध्ये आणि महागाई भत्त्यात सातत्याने वाढ केली होती.

जून २०२३ मध्येही महागाई भत्ता २८ टक्क्यांवरून ३४ टक्के इतका केला होता. आता गणपती उत्सवाच्या तोंडावर पुन्हा चार टक्क्यांनी महागाई भत्त्यात वाढ करण्यात आल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: MSRTC News

Recent Posts