संपूर्ण भारतामध्ये महत्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढावी आणि गतिमान वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येत आहे. त्यासोबतच आता सरकारच्या माध्यमातून वंदे भारत मेट्रो देखील सुरू करण्यात येणार असून सुरू असलेल्या वंदे भारत ट्रेनमध्ये अनेक आरामदायी असे बदल करण्यात येत आहे.
मोठ्या अंतराचा प्रवास कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी या आरामदायी ट्रेन खूप महत्त्वाच्या असून प्रवाशांच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसून येत आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर सध्या महाराष्ट्रामध्ये मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते मडगाव,
नागपूर ते बिलासपूर इत्यादि शहरांच्या दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू आहे व या ट्रेनला देखील प्रवाशांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. तसेच आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबई ते कोल्हापूर दरम्यान देखील वंदे भारत ट्रेन सुरू होईल अशी माहिती समोर आलेली आहे.
याच पार्श्वभूमीवर जर आपण महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर आणि वेगाने विकसित होणारे नासिक या दोन शहरांच्या दरम्यान विचार केला तर या शहरादरम्यान देखील आता वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे.
नाशिक ते पुणे रेल्वे मार्गावर दोन्ही बाजूंनी धावणार 24 वंदे भारत एक्सप्रेस
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नासिक ते पुणे या 235 किलोमीटरच्या सेमी हाय स्पीड डबल लाईन कॉरिडॉर प्रकल्पाकरिता नासिक रोड स्टेशनवर रेल्वेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रस्तावित मार्गावर दोन्ही बाजूंनी एकूण 24 वंदे भारत ट्रेन धावतील असे उद्दिष्ट ठेवण्यात आले
असल्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात नाशिक ते पुणे दरम्यानचा प्रवास हा वेगात व कमीत कमी वेळेत पूर्ण करता येणे शक्य होणार असल्याने भविष्यकाळात या प्रकल्पाचा फायदा अनेक दृष्टिकोनातून होणार आहे. भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडेय आणि मुंबईतील मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे यांच्यासोबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तपशीलवार या प्रकल्पा बाबत चर्चा केली
असून या महत्त्वाच्या कॉरिडॉरमध्ये अगदी सुरुवातीला 24 वंदे भारत ट्रेन आणि दोन इंटरसिटी गाड्या धावतील व त्यांचा वेग ताशी 200 किलोमीटर राहणार आहे.याशिवाय झालेल्या या बैठकीमध्ये रोलिंग स्टॉकची देखभाल व नाशिक मधील मेगा कोचिंग टर्मिनलची संकल्पना आराखड्यांवर देखील सूचना व प्रस्तावांना मंजूर देण्यासाठी चर्चा करण्यात आली.
या संपूर्ण प्रकल्पाकरिता 16,039 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच पुणे व नाशिक या दोन शहरांचा विकास आणि आजूबाजूच्या परिसराच्या विकासाला यामुळे मोठ्या प्रमाणावर हातभार लागेल.