Maharashtra News:ई-वाहनांच्या जामान्यात एसटीनेही ई-बस आणली. ज्या मार्गावरून एसटीची पहिली बस धावली, त्याच अहमदनगर-पुणे मार्गावर जून २०२२ पासून ही सेवा सुरू झाली.
मात्र, तीन महिन्यांतच त्यातील एक बस तूर्त बंद करण्याची वेळ आली आहे. अर्थात प्रवाशांचा प्रतिसाद नाही म्हणून नव्हे तर बसला अपघात झाल्यामुळे ती तूर्त बंद आहे.
नगर-पुणे या मार्गावर एसटीच्या दोन ई-बस सुरू आहेत. त्यातील एका बसला रविवारी रात्री पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथे अपघात झाला. या अपघातात बसची धडक बसून एक जण ठार झाला आहे.
त्यामुळे तांत्रिक कारणासाठी ही बस बंद आहे. तिची तपासणी आणि योग्य ती कायेदशीर पूर्तता झाल्यानंतर ती पुन्हा कार्यरत होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे काल या मार्गावर एकच बस धावली. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्या कारणामुळे ही सेवा बंद होणार नाही, असेही सांगण्यात आले.