अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Successful Farmer :- काळाच्या ओघात प्रत्येक क्षेत्रात बदल करणे अतिशय महत्त्वाचे ठरते, मग ते शेतीचे का क्षेत्र असेना बदल हा करावाच लागतो. बदलत्या काळानुसार शेतकरी बांधव देखील शेतीमध्ये बदल स्वीकारीत आहेत.
शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल स्वीकारल्याने काय परिणाम होतो याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते पुणे जिल्ह्यातून. पुणे जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याने शेती क्षेत्रात काळाच्या ओघात बदल करीत बाजारात सध्या मागणी मध्ये असलेल्या तैवान लॉनची यशस्वी शेती केली आहे.
विशेष म्हणजे या नवयुवक शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या तैवान लॉनला चांगली मागणी असून हा नवयुवक लाखो रुपये यातून कमवत आहे. जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील मौजे फुरसुंगी येथील युवा शेतकरी अक्षय हनुमंत कामठे यांनी ही किमया साधली आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अलीकडे घराजवळ, गार्डनमध्ये, बगीचा मध्ये, सार्वजनिक ठिकाणी गार्डन तयार करण्यासाठी तैवान लॉनचा वापर मोठा वाढला आहे.
यामुळे तैवान लॉनची मागणी मोठी वाढली असून याची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. याच्या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे तैवानची लागवड एकदा केल्यानंतर पुन्हा-पुन्हा करावी लागत नाही.
या पासून सुमारे एका वर्षातून तीनवेळा उत्पादन घेतले जात असल्याचा दावा केला जातो. मित्रांनो एक फूट बाय दोन फुटांची तैवानची लादी असते. त्याला प्रति स्क्वेअर फुटाला 6 ते 10 रुपये भाव मिळतो.
मात्र याची कापसाची मृदा अर्थात काळी कसदार मृदा असलेल्या जमिनीत लागवड करण्याचा सल्ला दिला जातो. मित्रांनो आपल्या राज्यात याला थोडी मागणी कमी असली
तरी देखील तैवान लॉनला आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, भोपाळ आणि गोवा या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात मागणी असते. मित्रांनो लॉनचे तीन प्रकार असतात. पहिला अमेरिकन, दुसरा तैवान, आणि तिसरा पास्को.
मित्रांनो मौजे फुरसुंगीच्या अक्षय कामठे यांनी शेतीमध्ये बदल करण्याच्या अनुषंगाने पीकपद्धतीत बदल करत तैवान लॉनची तीन एकर क्षेत्रात शेती केली आहे. याच्या एक एकर शेतीतुन सुमारे 20 हजार लादी निघते.
अक्षय यांच्या मते, सर्व खर्च वजा जाता यातून त्यांना दोन लाख रुपये एका वेळी शिल्लक राहतात. असे वर्षातून तीनवेळा उत्पादन घेतले जाते. म्हणजेच वर्षाकाठी त्यांना पाच ते सहा लाख रुपयांचे एकूण उत्पन्न मिळतं आहे.
विशेष म्हणजे या शेतीसाठी विशेष दक्षता घ्यावी लागत नाही मात्र दररोज एक तासभर ड्रीपने पाणी दिले जाते. याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे तैवान लॉनच्या शेतीसाठी खते, औषधे लागत नाहीत. यासाठी केवळ खुरपणी अर्थात निंदनी करावी लागते. त्यामुळे ही शेती कमी खर्चात आणि कमी श्रमात करता येण्यासारखी आहे.
मित्रांनो 2008 मध्ये अक्षय या नवयुवक शेतकऱ्याला एका नर्सरी मालकाने तैवान लॉनची शेती करण्याचा सल्ला दिला होता. या अनुषंगाने अक्षय यांनी याची शेती सुरू केली.
सुरुवातीला याच्या शेतीविषयी त्यांना काहीच माहिती नव्हती. त्यामुळे ते वर्षातून केवळ एक किंवा दोन वेळाच उत्पादन घेत होते. मात्र हळूहळू त्यांना या शेतीविषयी माहिती मिळतं गेली आणि आज ते या शेतीतुन तीनवेळा उत्पादन घेत आहेत.
मित्रांनो सुरुवातीच्या काळात जेव्हा अक्षय यांनी याची शेती सुरु केली आणि उत्पादन घेतले तेव्हा याला केवळ सहा रुपये भाव मिळत होता. मात्र, सद्यःस्थितीत 8 ते 10 रुपये भाव मिळत आहे.
शिवाय भविष्यात याची शेती अजूनच फायदा देणारी ठरणार आहे. कारण की, याचे आणखी दर वाढतील, असा अंदाज कृषी क्षेत्रातील जाणकार लोक व्यक्त करत आहेत.
निश्चितच अक्षय यांनी केलेला हां नाविन्यपूर्ण प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरणार आहे. काळाच्या ओघात आणि बाजारात असलेल्या मागणीनुसार जर पीक पद्धतीत बदल केला तर निश्चितच शेतीदेखील हमखास उत्पन्न देण्याचे साधन बनू शकते.