अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ या दोन राज्यव्यापी संघटनांची शुक्रवारी (दि.6 नोव्हेंबर) सांगली येथे बैठक पार पडली.
या बैठकित 30 नोव्हेंबर पासून राज्यातील साखर व जोड धंद्यातील कामगारांचा संप पुकारण्यात आला आहे. साखर कामगारांच्या वेतन वाढीच्या करारांची मुदत 31 मार्च 2019 ला संपली आहे.
फेब्रुवारी 2019 ला दोन्ही संघटनांनी महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री, सहकार मंत्री, कामगारमंत्री, साखर संघ अध्यक्ष, साखर आयुक्त, कामगार आयुक्त यांना नोटीसा देऊन नंतर नविन मागण्यांचे निवेदन दिले.
करारांची मुदत संपून देखील 18 महिने पुर्ण होऊनही अद्याप साखर व जोड धंद्यातील कामगाराच्या वेतन वाढीबाबत शासनाने वेतन वाढीच्या प्रश्नांची सोडवणुक केलेली नाही.
तर वेतनवाढीसाठी त्रिपक्ष समिती नेमली नाही. साखर कामगाराना दुर्लक्षित केल्यामुळे राज्यातील सर्व साखर कारखान्यातील व जोड धंद्यातील कामगार 30 नोव्हेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय बैठकित घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघांचे सहचिटणीस कॉ. आनंदराव वायकर यांनी दिली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रतिनिधी मंडळांचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे होते. या बैठकित शंकरराव भोसले, राऊ पाटील, अविनाश आपटे, आनंदराव वायकर आदींची भाषणे झाल्यानंतर बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय दोन्ही संघटनांनी एकत्रित घेतला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved