Tata Motors : जर तुम्ही टाटाच्या कारचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी तसेच मोठी संधी आलेली आहे. कारण Tata Motors फेब्रुवारी 2023 साठी त्यांच्या निवडक मॉडेल लाइन-अप Safari, Harrier, Altroz, Tigor आणि Tiago वर Rs 75,000 पर्यंत सूट देत आहे.
यामध्ये Tata Harrier आणि Tata Safari या कारवार सर्वाधिक सूट मिळत आहे. टाटा ही ऑफर 2022 आणि 2023 या दोन्ही मॉडेल्सवर देत आहे. टाटाच्या टियागो, टिगोर सीएनजीवरही या महिन्यात सूट मिळत आहे. जाणून घ्या सर्व यादी.
Tata Safari वर सवलत ऑफर
Tata च्या फ्लॅगशिप SUV 2023 Safari वर सर्व प्रकारांमध्ये एकूण 35,000 रुपयांची सूट मिळत आहे. यामध्ये 10,000 रुपयांची रोख सवलत आणि 25,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट समाविष्ट आहे. दुसरीकडे, Tata च्या 2022 Safari वर निवडलेल्या प्रकारानुसार एकूण 75,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
टाटा हॅरियरवर रोख सवलत
2023 Tata Harrier ला देखील या महिन्यात एकूण 35,000 रुपयांची सूट मिळते. यामध्ये 10,000 रुपयांची रोख सवलत आणि 25,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट समाविष्ट आहे. त्याच वेळी, 2022 Harrier ला एकूण Rs 75,000 पर्यंत सूट मिळत आहे, जी Tata Harrier च्या निवडक प्रकारांवर आहे.
टाटा टिगोरवर किती सूट?
टाटा या महिन्यात पेट्रोल टिगोरवर एकूण 20,000 रुपये आणि टिगोर सीएनजीवर 25,000 रुपये सूट देत आहे. 2022 Tigor ला CNG आणि पेट्रोल या दोन्हींवर एकूण 35,000 रुपयांची सूट मिळत आहे, ज्यामध्ये 20,000 रुपयांची रोख सूट आणि 15,000 रुपयांची एक्सचेंज सूट समाविष्ट आहे.
Tata Tiago वर किती डिस्काउंट ऑफर आहे?
टिगोर प्रमाणेच, Tiago हॅचबॅकच्या पेट्रोल आणि CNG प्रकारांवर अनुक्रमे 20,000 रुपये आणि 25,000 रुपये एकूण सूट मिळते. 2022 Tiago CNG आणि पेट्रोल प्रकारांवर एकूण 40,000 रुपयांची सूट मिळत आहे.
Tata Altroz वर किती सूट आहे?
प्रीमियम हॅचबॅक Tata Altroz पेट्रोल आणि डिझेल प्रकारांना ब्रँडकडून अनुक्रमे 10,000 रुपये आणि 25,000 रुपये एकूण सूट मिळते. Altroz च्या DCA पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर एकूण 20,000 रुपयांची सूट मिळते.
2022 Altroz पेट्रोल आणि डिझेल प्रकारांमध्ये अनुक्रमे 20,000 रुपये आणि 35,000 रुपये एकूण सूट मिळते. 2022 DCA पेट्रोल ऑटोमॅटिक Altroz वर एकूण 30,000 रुपयांची सूट मिळत आहे.