महाराष्ट्र

Tata Punch EV : टाटाचा मोठा धमाका ! लॉन्च करणार पंचचे इलेक्ट्रिक मॉडेल, जाणून घ्या फीचर्स, किंमत किती असेल…

Tata Punch EV : भारतीय बाजारपेठेत टाटा मोटर्स अनेक शक्तिशाली कार लॉन्च करत आहे. यामध्ये इलेक्ट्रिक, पेट्रोल, डिझेल, सीएनजी अशा अनेक कार टाटाने लॉन्च केल्या आहेत.

दरम्यान, भारतीय बाजारात टाटाची पंच ही कार ग्राहकांना खूप पसंत पडली आहे. मात्र आता टाटा मोटर्स बर्याच काळापासून पंचच्या इलेक्ट्रिक सेगमेंटवर काम करत आहे. जे लवकरच भारतीय बाजारातही लॉन्च केले जाऊ शकते.

टाटा मोटर्स लवकरच देशात त्यांची नवीन पंच ईव्ही लॉन्च करणार आहे. इतकंच नाही तर कंपनीच्या या कारमध्ये तुम्हाला उत्तमोत्तम फीचर्ससोबतच अतिशय स्टायलिश लूकही पाहायला मिळणार आहे.

यासोबतच या कारमध्ये खूप मजबूत रेंजही दिली जाऊ शकते. या कारमध्ये तुम्हाला उत्कृष्ट फीचर्स आणि सर्वोत्तम पॉवरट्रेन देखील पाहायला मिळतील. एकप्रकारे ही एक अशी कार असेल जी सर्व सुविधांनी परिपूर्ण असेल.

टाटा पंच ईव्ही पॉवरट्रेन

पंच इलेक्ट्रिकमध्ये झिप्टट्रॉन तंत्रज्ञानासह कायम चुंबक सिंक्रोनस मोटर आणि बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. या मिनी EV मध्ये बॅटरी पॅकचे अनेक पर्याय मिळू शकतात. यामध्ये 55kW ची मोटर दिली जाईल. ही मोटर 74 Bhp पॉवर आणि 170 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल.

टाटा पंच EV वैशिष्ट्ये

कंपनी या कारमध्ये खूप चांगले फीचर्स देखील देऊ शकते. यामध्ये Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंचाचे TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांसारखी मस्त वैशिष्ट्ये पाहता येतील.

टाटा पंच EV किंमत

कंपनीने सध्या या कारची किंमत जाहीर केलेली नाही. पण असे मानले जात आहे की कंपनी 10 लाख रुपयांपर्यंतच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत बाजारात लॉन्च करू शकते. म्हणूनच तुम्हालाही चांगली कार घ्यायची असेल, तर टाटा मोटर्सची ही आगामी धनसू कार एक उत्तम पर्याय ठरू शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts