ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या दिवसांत गारठा वाढला असून अहमदनगरमध्ये शनिवारी रात्री पारा १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता.
त्यामुळे रविवारी सकाळीही चांगलाच गारठा जाणवत होता.
नगरसोबतच पुण्यातीही गारठा जाणवत आहे. पुणे शहरात शनिवारी रात्री किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
उत्तर भारतात सुरू झालेली बर्फवृष्टी आणि राजस्थान मधून येणारे थंड वारे यामुळे राज्यातील तापमानात घट होत असल्याचे सांगण्यात आले.