दहावी-बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर ‘या’ दिवशी होणार परीक्षा !

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- राज्यात कोरोनामुळे यंदाच्या वर्षी परीक्षा कशी होणार याबाबत अजून माहिती पुढे आलेली नाही. राज्य शिक्षण मंडळाकडून परीक्षेच्या फक्त तारखा जाहीर करण्यात आल्या. यावर्षी कोरोनामुळे विविध मंडळांच्या परीक्षा उशीर होणार असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संकेत दिले होते.

राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल आणि मे मध्ये घेतल्या जाणार आहेत. परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या दरम्यान होणार आहे.

मात्र गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने काही जिल्ह्य़ांतील शाळा-महाविद्यालये काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय होणार याची चर्चा विद्यार्थी, शिक्षक, पालकांमध्ये सुरू झाली होती.

  • १० वीची परीक्षा केव्हा? (SSC Exam Schedule) इयत्ता १० वीची (SSC Exam) लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मेच्या दरम्यान होणार आहे.
  • १२ वीची परीक्षा केव्हा? (HSC Exam Schedule) इयत्ता १२ वीची (HSC Exam) लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहे.

दरम्यान बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर अधिकृत माहिती जाहीर केली जाईल. सोशल मीडियावर व्हायरल वेळापत्रकारवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पालकांना आणि विद्यार्थ्यांना करण्यात आलं आहे.

राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने तसेच आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सचूनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली जात असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts