Maharashtra news : सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच मुंबईतील शिवसेना भवनात हजेरी लावली आहे. तेथे कार्यकर्त्यांसमोर त्यांचे भाषण झाले.
यातून त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंबंधी त्यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, ‘शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही.अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी शब्द मोडला, पाठीत वार करुन पुन्हा एकदा शिवसेनेत संभ्रम निर्माण करण्यासाठी हा मुख्यमंत्री केला आहे. मात्र, हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही.’
ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
ज्या पद्धतीने सरकार स्थापन झालं आणि ज्यांनी सरकार स्थापन केलं त्यामध्ये त्यांनी तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं हेच मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो जे माझं आणि अमित शाहांचं ठरलं होतं तसं झालं असतं तर आज जे घडलं ते सन्मानाने घडलं असतं.
पहिल्या अडीच वर्षात एकाचा दुसऱ्या अडीच व.र्षा एकाचा मुख्यमंत्री झाला असता त्यावेळी नकार, आता भाजपने का केला, हा प्रश्न माझ्याप्रमाणे जनतेलाही पडलाय हेच ठरलेलं होतं, मग मला कशाला मध्येच मुख्यमंत्री व्हायला लावलं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता मला आज खरंच दु:ख झालं आहे
माझा राग मुंबईवर काढू नका, माझ्या पाठीत वार करा आरेचा निर्णय जो बदलला त्याने मला दु:ख झालं ७५ वर्षांत लोकशाहीचे धिंडवडे निघाले चारही स्तभांनी लोकशाही वाचविण्यासाठी पुढे यावं लोकशाही वाचविण्याची गरज निर्माण झालीये लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे मुंबईकरांच्या वतीने हात जोडून विनंती, आरेचा आग्रह नको कांजूरमार्गचा निर्णय कायम राहू द्या