लवकरच अनलॉक होणार बाळ बोठेचा ‘तो’ आयफोन ! नेमकी कोणती माहिती समोर येणार ?

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बोठे याने जरे यांना मारण्याचा कट कसा रचला व हत्याकांडामागचे नेमके कारण काय?, हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे.

जरे हत्याकांड प्रकरणात बोठेचे नाव आल्यांनतर याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यांना आयफोन सापडला होता. हा आयफोन लॉक असल्यामुळे तो उघडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. या फोनला छेडछाड झाल्यास त्यामधील डाटा करप्ट होण्याचा धोका होता. त्यामुळे पोलिसांनी एका खाजगी कंपनीला तसेच मुंबईच्या सायबर पोलिसांना संपर्क केला होता. बंगलौर येथील कंपनीने आयफोन उघडण्यास सहा महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे सांगतिले होते.

बरच काही समोर येण्याची शक्यता :- रेखा जरे हत्याकांड प्रकरणात फरार आरोपी बाळ बोठे याला अटक केल्यानंतर नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. रेखा जरे हत्याकांड प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना त्याच्या घरांमधून एक फोन मिळाला होता त्या आयफोन मधून बरच काही समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहरातील नामांकित लोकांचा लोकांची फसवणूक :- फरार आरोपी बाळ बोठे मोठे संपादक असलेल्या वृत्तपत्रातून त्यांनी हनी ट्रॅपची मालिका प्रकाशित केली होती त्या मालिकेचा ही तपास होण्याची शक्यता आहे . हनी ट्रॅप च्या तथाकथित मालिकेत शहरातील नामांकित लोकांचा लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे.

आयफोन आज उघडला जाणार :- बोठे याचा पोलिसांनी जप्त केलेला आयफोन आज उघडला जाणार आहे. आता बोठे याच्या आयफोन मधून काय रहस्य निघणार ? याची उत्सुकता आहे.

नेमकी कोणती माहिती समोर येणार :- आता पोलिस बोठे याच्याकडे चौकशी करीत असून त्याचा आयफोन सुद्धा आज उघडला जाणार आहे आहे. बोठे एका दैनिकाचा संपादक होता त्यामुळे त्याचा अनेकांशी संपर्क होता आता या आयफोन मधून नेमकी कोणती माहिती समोर येतेयं, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

बाळ बोठेची सुसाईड नोट :- पोलिसांनी बोठे याला हैदराबाद येथील बिलालनगर परिसरातील हॉटेलमधून अटक केली तेव्हा झडती घेतली. त्याच्या खिशात एक पानाची सुसाईड नोट आढळून आली. ‘माझा कोणत्याही प्रकारे अथवा माझा नैसर्गिक मृत्यू झाला तर माझ्या कुटुंबीयांना संपर्क करावा’, असा उल्लेख या नोटमध्ये असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts