महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: प्रकरण आता घटनापीठाकडे, आज काय झालं?

Maharashtra News:महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. आज दुपारी हे प्रकरण सुनावणीसाठी घेतल्यानंतर काही मिनिटांतच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

त्यानुसार हे प्रकरण आता ५ न्यायधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग होणार आहे, दरम्यान, पक्ष चिन्हासंबंधी निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या कामकाजाला स्थगिती देण्यात आली असून त्यावर पुढे काय करायचे याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयातील सध्याच्यात खंडपीठापुढे २५ ऑगस्टला होणार आहे.

त्यामुळे आज लांबणीवर पडता पडता सुनावणीस घेतलेले हे प्रकरण शेवटी पुन्हा एकदा लांबणीवरच पडले आहे. मूळ प्रकरणावरील सुनावणी आथा घटनापीठासमोर होणार आहे.

या पीठाची नियुक्ती सरन्यायाधीशांकडून केली जाणार आहे. तसेच या घटनापीठासमोर कोणत्या मुद्द्यांवर सुनावणी व्हावी, हेही ठरविण्यात येणार आहे.

उपाध्यक्षांच्या अधिकाराचं काय होणार? निवडणूक आयोगाला किती अधिकार आहेत? अपात्रसंदर्भातील निर्णय लागू होतो की नाही? हे सर्व निर्णय एकमेकांत गुंतलेले आहेत. त्यावर निर्णय घेण्याचे काम घटनापीठाकडे सोपविले जाऊ शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts