महाराष्ट्र

महाराष्ट्रीयन माणूस चालवतोय गुजरातचं सरकार, केजरीवालांनी ठेवलं बोट

अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Maharashtra news : मुंबईतील अनेक संस्था, कार्यालये गुजरातमध्ये पळविल्याचा आरोप होतो. केंद्राकडून गुजरातला झुकतं माप देताना महाराष्ट्रावर अन्याय केल्याचा आरोप होतो.

गुजरातींचा महाराष्ट्रात हस्तक्षेप वाढल्याचाही आरोप होत असतो. मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका वेगळ्याच मुद्द्याकडं लक्ष वेधलं आहे.

भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील मूळचे महाराष्ट्रातील आहेत. गुजरातचं सरकार त्यांच्याच इशाऱ्यावर चालते असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

यासंबंधी ट्विट करून केजरीवाल यांनी म्हटलं आहे की, ‘महाराष्ट्राचे सी. आर. पाटील हे गुजरातच्या भाजपचे अध्यक्ष आहेत. तेथे भाजपला अध्यक्षपदासाठी एकही गुजराती माणूस मिळाला नाही का? लोक म्हणतात की, पाटील केवळ प्रदेशाध्यक्ष नाहीत तर गुजरात सरकार तेच चालवित आहेत.

तेच खरे मुख्यमंत्री आहेत. हा गुजरातचा घोर आपमान आहे. भाजपवाल्यांनो, गुजरातला गुजराती अध्यक्ष द्या,’ असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत रघुनाथ उर्फ सी. आर. पाटील यांची २०२० पदी या पदावर नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ही नियुक्ती केली आहे.

पाटील मूळचे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते गुजरातमध्ये कार्यरत आहेत. १९८९ मध्ये ते सुरतमध्ये पोलिसांत भरती झाले होते.

पुढे नोकरी सोडून समाजकारण आणि राजकारणात प्रवेश केला. भाजपमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केले. सध्या पाटील नवसारी मतदारसंघातून खासदार आहेत. पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्ती मानले जातात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts