इंदोरीकर महाराज खटल्याची सुनावणी ‘या’ दिवशी होणार

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत कीर्तन करणारे कीर्तनकार इंदोरीकर महाराज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

वादग्रस्त वक्तव्य केल्याने कीर्तनकार निवृत्ती देशमुख (इंदोरीकर) महाराजांवर दाखल खटल्याची आज सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस) ने अर्ज दाखल केला आहे.

‘अंनिस’तर्फे दाखल करण्यात आलेला अर्ज संगमनेरच्या सत्र न्यायालयाने आज मंजूर केला आहे. त्यामुळे खटल्याला स्थगिती दिल्याच्या प्रकरणात सरकारी वकिलांसोबतच ‘अंनिस’चा युक्तिवाद ऐकल्यानंतरच न्यायालयाला निर्णय घ्यावा लागणार आहे,

यामुळे या खटल्याची पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला होणार आहे. इंदोरीकरांच्या वकिलांचा युक्तिवाद तसेच सरकारी वकील आणि ‘अंनिस’ यांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाला त्यावर निर्णय घ्यावा लागणार आहे.

तो काहीही झाला तरी प्रकरण उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. यामुळे मूळ प्रकरणाची सुनावणी लांबण्याची शक्यता आहे. नेमके प्रकरण काय आहे जाणून घ्या जाहीर कीर्तनातून अपत्यप्राप्ती बाबत केलेल्य़ा वादग्रस्त वक्तव्यामुळे

निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) त्यांच्या विरोधात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल झाला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts