महाराष्ट्र

स्थगिती उठविली, गाजणाऱ्या या बँकेची रणधुमाळी पुन्हा सुरू

Maharashtra News:जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीवरील स्थगिती उच्च न्यायालयाने उठविली आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया जेथे थांबली तेथून सुरू होणार आहे.

नव्या बदलानुसार आता १६ ऑक्टोबरला मतदान तर १७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. आहे तेच उमेदवार राहणार असल्याने थांबलेला प्रचार पुन्हा सुरू होणार आहे.

या बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना राज्य सरकारने राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका अतिवृष्टीमुळे स्थगित केल्या होत्या. त्यामध्ये शिक्षक बँकेची निवडणूकही स्थगिती झाली.

सरकारने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी शिक्षक सभादाने दाखल केलेली याचिका मंजूर केली आहे. त्यानुसार मतदान आणि मतमोजणीची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. दिवळीच्या आधीच निवडणुकीचा बार उडणार असल्याने सहामाही परीक्षेच्या तोंडावरच शिक्षक मंडळची यात पुन्हा व्यस्त होणार आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts