भाचीने गळफास घेत संपविले जीवन, धक्का सहन न झाल्याने मामाचा झाला असा शेवट

अहमदनगर :- भाचीने गळफास घेतल्याचे घटना मामाला कळताच त्या धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला. मामाचे ह्यदयविकाराने निधन झाले.

महिलेच्या गळफासप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कॅलिस्टा ग्रॅहम रॉक (वय-३२, रा. सौरभनगर, भिंगार) असे गळफास घेतलेल्या युवतीचे नाव आहे.

भिंगारमधील सौरभनगर येथे रॉक या युवतीने मंगळवारी पहाटच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. हा धक्का मामाला सहन झाला नाही.

काही वेळातच मामाला ह्यदयविकाराचा झटका आला. गळफास घेतलेल्या महिलेला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आत्महत्याचे कारण समजू शकले नाही.युवतीने गळफास हा नाजूक प्रकारातून घेतल्याचे समजते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts