महाराष्ट्र

कंत्राटी नोकरभरती महाआघाडीचे पाप ! अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी जनतेची माफी मागावी

Maharashtra News : शासकीय नोकरभरती कंत्राटी पध्दतीने करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे पाप आहे.

कंत्राटी भरती ज्यांनी सुरु केली तेच आज कंत्राटी भरती विरोधात आंदोलन करून जनतेची दिशाभुल करून त्याचे खापर महायुती सरकारवर फोडत आहेत, याचा भाजपाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो.

तसेच याबाबत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (उवाठा) या पक्षाचे नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी जनतेची माफी मागावी, असे प्रतिपादन भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी केले.

पाथर्डी तालुका भाजपच्या वतीने भाजपा आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्षांपूर्वी कंत्राटी भरती सुरु करण्याचा निर्णय घेणाऱ्या काँग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री व नेत्यांचा तहसील कार्यालयाच्या आवारात घोषणा देत जाहीर निषेध करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

या वेळी माजी जि. प. सदस्य राहुल राजळे, माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, कुंडलिक आव्हाड, अशोक चोरमले, अमोल गर्जे, कुंडलिक आव्हाड, अजय रक्ताटे, नारायण पालवे, शहराध्यक्ष अजय भंडारी, अनिल बोरुडे, बजरंग घोडके, बंडूशेठ बोरुडे, महेश बोरुडे, अशोक दहिफळे, जमीर आतार, रविंद्र वायकर, जगदीश काळे, प्रा. रमेश काटे, बबन बुचकुल, सुनिल ओव्हळ, नामदेव लबडे, भगवान साठे, हर्षद गर्जे,

अनिल पालवे, ललित खेडकर, अक्षय दातीर, शिवनाथ मोरे, राधाकिसन मरकड उपस्थित होते. गेली वीस वर्षे युवकांसाठी कर्दनकाळ ठरलेला कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करून राज्यातील युवकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वा खालील महायुती सरकारचे अभिनंदन करत आहोत.

तसेच याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) या पक्षाचे नेते अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी जनतेची माफी मागावी, असेही निवेदनात म्हटले आहे.. नायब तहसीलदार मुरलीधर बागुल यांनी निवेदन स्वीकारले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts