Maharashtra News : लम्मीच्या आजाराने तालुक्यातील हंडाळवाडी परीसरात संसर्ग वाढत असल्याचे तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. जनावरामधे लंम्पीचा प्रसार होवु नये यासाठी पाथर्डी बाजार समितीचा जनावरांचा बाजार भरणार नाही. अशी माहीती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाषराव बर्डे यांनी दिली.
याबाबत शेतकऱ्यांसाठी बुधवारच्या आठवडा बाजाराची माहीती व्हावी, यासाठी बाजार समितीने प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. पत्रकारांना माहीती देताना सभापती बर्डे म्हणाले, जनावरांमधे लम्पी आजाराचा वाढता प्रसार पाहता बाजार भरविणे जिकरीचे आहे.
लम्पी आजार हा संसर्गजन्य आहे. तालुक्यातील हंडाळवाडी परीसरात लंम्पीचे काही जनावरे आढळले असल्याचे तालुका महसुल प्रशासनाने कळविले आहे. तसेच बार भरल्यास लम्पी आजाराचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने व तहसिलदार यांनी तसे कळविल्याने मोठ्या जनावरांचा गाई, म्हैस व बैल यांचा आठवडाबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र शेळ्यांचा व मेंढ्याचा बाजार सुरु राहील. तरीपण शेतकऱ्यांनी मोठे जनावरे विक्रीसाठी बार समितीमधे आणु नयेत. शेतकऱ्यांनी अनाधिकृतपणे बाजारात जनावरे आणल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश असल्याने असे कोणीही काही करु नये.
पशुधन वाचविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तरीपण शेतक-यांनी सहकार्य करावे असे आवाहन बर्डे यांनी केले आहे. महसुल प्रशासनाचा पुढील आदेश आल्यानंतर बाजार कधी सुरु होईल याची माहीती शेतकऱ्यांना दिली जाईल असे बाजार समितीचे सचिव बाळासाहेब बोरुडे यांनी सांगितले.