अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- प्रेमप्रकरणातून अनेकदा मारहाण, धमकावणे, बळजबरी करणे यासारख्या गोष्टी घडत असतात. मात्र जिल्ह्यातील अशाच एका प्रेमप्रकरणातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जिल्ह्यातील राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे प्रेम प्रकरणातून झालेल्या गोळीबारातील जखमी तरुण विक्रम उर्फ विकी रमेश मुसमाडे याचा लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मंगळवार १५ सप्टेंबर रोजी पहाटच्या सुमारास प्रियेसीच्या घरात घुसून प्रियेसीवर व स्वतः गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न येथील विक्रम मुसमाडे या युवकाने केला. या गोळीबारात प्रियेसी किरकोळ तर विक्रम मुसमाडे गंभीर जखमी झाला तो जागेवर पडून होता.
याच वेळी विक्रम याच्या मित्रांनी त्यास उचलून तातडीने त्यास लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान गोळीबारात विक्रमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वैद्यकीय सूत्रांनी त्याच्यावर उपचार सुरू करून ७२ तासाचा अवधी दिला होता.
विक्रमला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर गुरुवारी सायंकाळी प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने विक्रमला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत म्हणून घोषित केले. दरम्यान विक्रमच्या मृत्यूची घटना समजताच विक्रमच्या नातेवाईक व मित्र परिवार यांनी शोक व्यक्त केला.
विक्रम याच्या मित्रांनी आपल्या व्हाट्स अप स्टेटसवर त्या तरुणी सोबत विक्रमचे असलेले फोटो व्हायरल करून हे एकतर्फी प्रेम मुळीच नव्हते असे सांगून या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान शोकाकुल वातावरणात विक्रम याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved