पारनेर :- लाेकायुक्त, लाेकपाल नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या ५ दिवसांपासून राळेगण सिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपाेषण सुरू आहे.
…केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही !
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी त्यांची भेट घेऊन चर्चा केली व उपाेषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आता केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही, जाेपर्यंत निर्णय हाेत नाही ताेपर्यंत उपाेषण मागे घेणार नाही, असे अण्णांनी महाजन यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे ते आल्यापावली परत गेले.
…तर ‘पद्मभूषण’ पुरस्कार परत .
दरम्यान आज पुन्हा महाजन व अण्णांची चर्चा हाेणार आहे. येत्या ८ फेब्रुवारीपर्यंत आपल्या मागण्यांवर सरकारने निर्णय न घेतल्यास ‘पद्मभूषण’ पुरस्कार परत करू, असा इशाराही अण्णांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.