महाराष्ट्र

दुधाला व शेतीमालाला भाव नाही. हे घोषणाबाजाचे सरकार – आमदार प्राजक्त तनपुरे

Maharashtra News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. जिल्ह्यात सुमारे १५ ते २० नवीन सबस्टेशन दिले. १००० च्या आसपास नवीन ट्रांसफार्मर उभारले.

वांजूळपोई येथील हे पाच मेगावॅट वीज उपकेंद्र त्यापैकीच एक आहे. आम्ही प्रत्यक्ष कामे केली पण महायुतीचे सरकार हे आमच्या चांगल्या कामांना स्थगिती देऊन अडविण्याचे काम करत आहे.

आज दुधाला व शेतीमालाला भाव नाही. हे घोषणाबाजाचे सरकार आहे. अशी टिका माजी ऊर्जा राज्यमंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.वांजुळपोई येथील पाच मेगावॅट क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे उद्घाटन आ.तनपुरे व आ.लहु कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. तनपुरे बोलत होते.

आ. तनपुरे पुढे बोलताना म्हणाले, या सबस्टेशनमुळे तिळापुर, वांजुळपोइ, कोपरे, शेनवडगाव, मांजरी या गावांना पूर्ण दाबाने पुरेशी वीज मिळणार आहे. दुधाला योग्य भाव मिळाला पाहिजे.

या सरकारचे दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. आमच्या काळात अशी परिस्थिती झाली होती तेव्हा राज्य सरकारने स्वतः दूध खरेदी करून शेतकऱ्यांना योग्य भाव दिला होता. आता राज्य व केंद्र सरकारने योग्य भाव दिला पाहिजे, असेही आ.तनपुरे म्हणाले.

आ. कानडे म्हणाले, राहुरी तालुक्याला कै. बाबुरावदादा यांनी गत वैभव प्राप्त करून दिले. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी त्यात भर घातली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आ. तनपुरे चांगले काम करत आहेत.

त्यांच्या मंत्री पदाचा फायदा श्रीरामपूर विधानसभेलाही झाला आहे. प्रास्ताविक आप्पासाहेब जाधव यांनी केले. प्रकाश देठे, योगेश पवार, रवींद्र आढाव यांनी मनोगत व्यक्त केली.

यावेळी एकनाथ पवार, विष्णुपंत ठोसर, भारत विटनोर, सोपान बाचकर, दत्तात्रय जाधव, प्रभाकर जाधव, भगीरथ जगताप, जगन्नाथ जगताप, रवींद्र पवार आदींसह परिसरातील शेतकरी, लाभधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अप्पासाहेब जाधव यांनी तर आभार अशोक विटनोर यांनी मानले.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रखमाजी जाधव, बाळासाहेब खुळे, माजी उपसभापती रवींद्र आढाव, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरेश निमसे, सचिन भिंगारदे, डॉ. राजेंद्र बानकर, मांजरीच्या सरपंच लता आंबडकर, तिळापुरचे सरपंच बापू आघाव, पाथरेचे सरपंच ज्ञानेश्वर गावडे, भगीरथ जाधव, शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, कोंडराम विटनोर, बाळासाहेब जाधव मंचावर उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts