एका शववाहिकेत 12 कोरोनाबाधितांचे मृतदेह होते, इतका भयंकर प्रकार पाहिल्यावर मन …

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- कोरोनाग्रस्ताच्या अंत्यसंस्कारावेळी मृतदेहांची प्रचंड अवहेलना व हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार नगरच्या जिल्हा रूग्णालयात उघडकीस आला आहे.

नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन दिले असून मानवतेला काळीमा फासणारे प्रकार सध्या सुरु असल्याचे म्हटले आहे. या व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईल आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा बोराटे यांनी दिला आहे.

मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात बोराटे यांनी नमूद केले आहे की, कोरोनाचा उद्रेक होत असताना प्रशासकीय पातळीवर ज्या पध्दतीने उपाययोजना होणे अपेक्षित आहे,

तशा त्या होताना दिसून येत नाही.माळीवाडा भागातील एका मित्राचे वडील करोनामुळे मयत झाले. त्यांना पाहण्यासाठी जिल्हा रूग्णालयात गेलो असता

त्याठिकाणी एकाच शववाहिकेत दिवसभरात मयत झालेले मृतदेह एकावर एक रचून अस्ताव्यस्त ठेवलेले दिसून आले.एका शववाहिकेत 12 मृतदेह होते.इतका भयंकर प्रकार पाहिल्यावर मन हेलावून गेले.

मयत झालेल्या रूग्णांना अशा प्रकारे अंत्यविधीसाठी नेणे मानवतेला काळीमा फासणारे आहे. प्रशासनाचा भोंगळ कारभार यातून उघड होत असून यात सुधारणा करण्याची मागणी बोराटे यांनी केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts