Richest Saints of India : भारत हा संत महात्म्यांचा देश आहे. देशातील मोठ्या प्रमाणात लोक साधू बाबांचे भक्त आहेत. मात्र भगव्या रंगाचे कपडे परिधान केलेले हेच साधूबाबा चक्क कोटींचे मालक आहेत.
सहसा या गोष्टींवर विश्वास ठेवणे सोप्पे नाही, मात्र हे खरे आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशाच काही ऋषींची माहिती देत आहोत ज्यांची एकूण संपत्ती करोडोंमध्ये आहे. यातील एका बाबाने तर स्वतःचा देश स्थापन केला आहे.
वादग्रस्त धार्मिक नेते नित्यानंद हे देशातील सर्वात श्रीमंत बाबांपैकी एक आहेत. भारतात लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या नित्यानंदने इक्वेडोरजवळ एक बेट विकत घेतले आहे. त्यांनी या बेटाचे नाव कैलास असे ठेवले.
2003 पासून नित्यानंद संत म्हणून त्याचा प्रचार सुरू झाला. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, नित्यानंद यांच्याकडे एकूण 10,000 कोटींची संपत्ती आहे. जगभर त्याच्या नावाने अनेक गुरुकुल, आश्रम, मंदिरे सुरू आहेत.
आसाराम बापू हे देखील देशातील वादग्रस्त बाबांपैकी एक आहेत. बलात्काराच्या आरोपाखाली आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तो सध्या राजस्थानमधील जोधपूर कारागृहात बंद आहे.
आकडेवारीनुसार, आसारामचे देशभरात एकूण 350 हून अधिक आश्रम आहेत. आसाराम ट्रस्टनुसार एकूण उलाढाल 350 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर आसाराम यांच्याकडे एकूण 134 दशलक्ष डॉलर्स आहेत.
योगगुरू बाबा रामदेव यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडची स्थापना केली आहे. यापूर्वी 1995 मध्ये त्यांनी दिव्य योग मंदिराची स्थापना केली होती. ते देशातील प्रसिद्ध योगगुरू मानले जातात, ज्यांनी योगाला केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात एक वेगळी ओळख दिली आहे. त्यांच्याकडे एकूण 1,600 कोटी रुपये आहेत.
श्री-श्री रविशंकर हे देशातील सर्वात प्रसिद्ध गुरूंपैकी एक आहेत. जगभरातील 150 देशांमध्ये त्यांचे 300 दशलक्षाहून अधिक अनुयायी आहेत. तो अनेक आयुर्वेदिक औषधांचा व्यवसायही करतो. ते 1,000 कोटींहून अधिकचे मालक आहेत.
देशातील सर्वात श्रीमंत साधूंच्या यादीत माता अमृतानंदमयी यांचा समावेश होतो. ती केरळची असून तिच्याकडे एकूण 1,500 कोटी रुपयांची मालकी आहे. तसेच ईशा फाऊंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव हे देखील करोडोंचे मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 18 कोटी रुपये आहे.