अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारांच्या जवळपास पोहचली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांची स्रावतपासणी मोफत करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
प्रवरा उद्योगसमूहाने सामाजिक बांधिलकी म्हणून कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना,
गणेश सहकारी साखर कारखाना आणि डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे मेमोरिअल हॉस्पिटलच्या सहकार्याने करण्यात आली आहे.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने, कोरोना चाचणी मोफत करण्याचा निर्णय घेतला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलच्या सहकार्याने ही चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved