महाराष्ट्र

फडणवीसांनी कृषिमंत्री सत्तारांना भर बैठकीत झापलं, हे आहे कारण

Maharashtra News:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच खडे बोल सुनावले. योजनांबद्दल घोषणा करताना तुम्ही अगोदर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे अपेक्षित आहे.

या पुढे घोषणा करण्याअगोदरच आमच्याशी चर्चा करा, असा आदेशच फडणवीसांनी मंत्र्यांना दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची री ओढत सर्वच मंत्र्यांना उद्देशून असा आदेश दिला.

नव्या सरकारमधील मंत्र्यांनी लोकप्रिय घोषणांचा सपाटा सुरू केला आहे. त्या प्रत्यक्षात आणणे अवघड आहे. त्यामुळे अनेक विभागांनी मंत्र्यांच्या तक्रारी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे केल्या.

त्यामुळे फडणवीसांनी थेट हा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत मांडून उतावीळ मंत्र्यांना झापाले. सत्तार यांनी अलीकडेच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी सन्मान योजना सुरु करण्याची घोषणा केली होती.

मात्र मंत्रिमंडळ बैठकीत कोणताही निर्णय झालेला नसताना, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना संबंधित योजनेची माहिती नसताना तुम्ही कसा काय निर्णय जाहीर करु शकता?

असा सवाल करत फडणवीसांनी सत्तारांना धारेवर धरले. यावर सत्तार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपण निर्णय घेतला असे म्हणालेलो नाही,

पण विचार सुरु असल्याचे म्हणलो, मात्र पत्रकारांनी निर्णय घेतल्याच्या बातम्या दिल्या. मात्र, त्यांच्या या उत्तरावर वरिष्ठांचे समाधान झाले नाही.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts