Maharashtra News : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांची इडी मार्फत चौकशी झाल्यानंतर संपूर्ण गांधी कुटुंबीय आता परदेश दौऱ्यावर निघाले आहे.
या दौऱ्यात सोनिया गांधी यांच्यावर उपचार करण्यात येणार असून त्या आपल्या आईच्या गावीही जाऊन येणार आहेत. काँग्रेसतर्फे ही माहिती देण्यात आली आहे.
सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात जाणार आहेत. त्यांच्यासोबत राहुल आणि प्रियांका गांधी-वाड्रा याही जाणार आहेत. सोनिया गांधी यांच्यावर वैद्यकीय उपचार आणि आईच्या गावाला भेट देणार आहेत.
त्यानंतर ते परत येणार असून राहुल गांधी ४ सप्टेंबरला दिल्लीत काँग्रेसच्या महागाई विरोधी रॅलीला उपस्थित राहणार आहेत. अलीकडेच गांधी यांची इडीकडून चौकशी करण्यात आली.
नॅशन हेरॉल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल यांची चौकशी झाली. मात्र, त्यावर अद्याप पुढे काहीही कारवाई झालेली नाही. अशातच आता संपूर्ण गांधी कुटुंबीय परदेश वारीला निघाले आहे.