आज मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार पैसे; ‘असे’ चेक करा आपले नाव आहे कि नाही

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मागील वर्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. 

या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये देणार आहे. या योजनेचे दोन टप्पे पार पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेगा कार्यक्रमात पंतप्रधान किसान योजनेचा सहावा हप्ता जाहीर करणार आहेत. 

या हप्त्यानुसार आज शेतकऱ्यांच्या  खात्यात 2000 रुपये जमा होतील. आज सुमारे साडेआठ कोटी शेतकर्‍यांना हे पैसे मिळतील. हे पैसे आपल्या बँक खात्यात येतील की नाही हे आपण आता तपासू शकता. पंतप्रधान किसान योजनेचे पैसे केवळ ज्यांनी आपला आधार क्रमांक खात्याशी जोडला आहे त्यांनाच मिळणार आहेत.

10 कोटी शेतकर्‍यांना मिळाले पैसे :- पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे साडे आठ कोटी शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान योजनेची रक्कम जाहीर करतील. हा हप्ता सुमारे 17,000 कोटी रुपयांचा असेल.

१ डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (पीएम किसान) कोट्यवधी शेतकर्‍यांना 75,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम थेट लाभ म्हणून उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

असे चेक करा आपले नाव आहे कि नाही :- या योजनेतील आपले नाव आणि सद्यस्थिती https://pmkisan.gov.in  या वेबसाईटवर क्लिक करुन मेन्यू मध्ये जावून फार्मर कॉर्नर वर जावे. लाभार्थी सूची च्या लिंकवर क्लिक करावी. आपले राज्य, जिल्हा उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव ही माहिती भरावी.

यानंतर आपल्याला गेट रिपोर्ट वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्याला सर्व माहिती मिळेल. ज्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ सरकारकडून दिला गेला आहे, त्यांचेही नाव राज्य/जिल्हावार/तहसील/गावागप्रमाणे पाहू शकता. यामध्ये सरकारने सर्व लाभार्थ्यांची पुर्ण सूची अपलोड केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts