अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच जनतेला काही ना काही दिलंय. तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!. विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबवण्यात अधिक मदत करेल,
असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. फडणवीस यांच्या फेसबुक पोस्टला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे.पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे.
आपले केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही, बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून.., असा टोला आव्हाड यांनी फडणवीसांना लगावला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. राज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला.
त्यानंतर, भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.होती. त्यावर फडणवीस यांनी टीका करत आपल्या फेसबुक पोस्टवरुन जगभरातील देशांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये जनतेला दिलेल्या पॅकेजी आणि सुविधांनी यादीच जाहीर केली.
त्याला आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते की, ब्राझील, फ्रान्स, बल्गेरिया, रशिया मधल्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी देत तिथं लादण्यात आलेल्या कठोर निर्बंध आणि लॉकडाऊनबाबत सांगून विरोधकांवर निशाणा साधला.
“देशाबाहेर कोरोनाची स्थिती भयंकर होत चालली आहे. अनेक ठिकाणी आजही लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादलेले आहेत. पण, आपण राज्यातील जनतेचा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करुन अद्याप तरी लॉकडाऊन केलेला नाही.
त्यामुळे विरोधकांनी कोरोनाचं राजकारण करू नये. उलट त्यांनी राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांसाठी मदत करण्याची भूमिका घ्यावी”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.