महाराष्ट्र

Tractor Subsidy Scheme : सरकारची भन्नाट योजना ! शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर- ट्रॉली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान; घ्या असा लाभ

Tractor Subsidy Scheme : शेतकरी म्हटलं की सर्वात महत्वाचे म्हणजे ट्रॅक्टर. कारण शेतीची मशागत करण्यासाठी किंवा नवीन पिकाची लागवड करण्याअगोदर शेतीची मळणी करण्यासाठी ट्रॅक्टर खूप गरजेचं असतो.

जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला केंद्र सरकारच्या 90 टक्के अनुदानातून ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सरकारच्या या योजनेचा फायदा खास शेतकऱ्यांना होणार आहे.

शेती क्षेत्रात विकास होण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडावी,या करता शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रकारचे योजना राबवत आहे. केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवले जात आहेत. या योजना पैकी ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी साठी 90 टक्के अनुदान ही एक योजना आहे.

आजकाल शेतीतील जवळपास सगळीच कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जातात. फळबागांकरिता विशेष करून ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

सरकारी योजनेमध्ये आपल्याकडे जुनी विहीर असेल तर सरकारी योजनेमधून नवीन विर बांधायचे असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला 90 टक्के अनुदान मिळते.

अर्ज कुठे आणि कसा करायचा?

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने महाडीबीटी पोर्टल वरती 2022 -23 या सालाकरिता ही योजना चालू केली आहे. वरती ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत. 90 टक्के अनुदान सरकारच्या बऱ्याच योजनांसाठी लागू करण्यात आलेले आहे.

आपण ट्रॅक्टर ट्रॉली या योजनेचा फॉर्म कसा आणि कुठे भरायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. आपण जर सरकारी योजनेसाठी अगोदर महाडीबीटी पोर्टल वरती एखादा अर्ज भरला आहे का नाही याची माहिती असणे गरजेचे आहे. जर आपण एखादा अर्ज भरला असेल, तर तो आपण एडिट करून पुन्हा फक्त या योजनेसाठी अर्ज भरू शकतो.

2021- 22 च्या महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही जर अर्ज केला असेल तर तो पुन्हा एकदा एडिट करून भरू शकता. पेट्रोल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करावा लागेल. हा अर्ज आपण कोणत्याही नेट कॅफे किंवा सायबर कॅफेवर जाऊन भरू शकतो.

आवश्यक कागदपत्रे –

पॅन कार्ड
ओळखपत्र
शेतीचा सातबारा
अर्जदाराचे आधार कार्ड
दोन फोटो
आपला चालू मोबाईल नंबर
ईमेल आयडी
ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी करण्यासाठी चे कोटेशन
अशा प्रकारची कागदपत्रे आपल्याला अर्ज करताना लागतात. आणि ही सर्व कागदपत्रे घेऊन आपली माहिती अपलोड करावी लागेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts