महाराष्ट्र

Tripti Desai : तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश द्या, अन्यथा मार्च महिन्यात…, तृप्ती देसाई यांचा इशारा..

Tripti Desai :  तुळजापूरच्या तुळजाभवानी माता मंदिरात नुकतेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या देवीच्या दर्शनाला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचे समोर आले असल्याची माहिती भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या देवीच्या मंदिरात भोपे कुटुंबातील महिलांना गाभाऱ्यात प्रार्थना करायला तसेच आराधना करायला नाकारले. यामुळे तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत.

त्या म्हणाल्या, पुरुष आणि महिला भक्तांबरोबर होणारा दुजाभाव थांबवावा. तसेच भोपे कुटुंबातील महिलांना गाभाऱ्यात प्रार्थना करायला तसेच आराधना करायला गाभारा प्रवेश द्यावा, अन्यथा मार्च महिन्यात या भोपे कुटुंबातील महिलांना घेऊन गाभारा प्रवेश करणार, असा इशाराही त्यांनी मंदिर प्रशासनाला दिला आहे.

याबाबत तृप्ती देसाई यांनी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केली आहे. नीलम गोऱ्हे यांना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारणं हे धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे येणाऱ्या काळात यावरून वाद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तृप्ती देसाई यांनी अनेक मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी अनेकदा आंदोलने केली आहे. यासाठी त्यांना अटक देखील करण्यात आली होती. यामुळे त्या नेहेमी चर्चेत असतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts