अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : निवृत्तीनंतरची आर्थिक तरतूद करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या ‘अटल पेन्शन’ योजनेतील मासिक पेन्शन मर्यादा १० हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली आहे .
अटल पेन्शन योजनेअंतर्गत (एपीवाय) देण्यात येणारे कमाल निवृत्तीवेतन वाढवून ते महिन्याला १० हजार रुपये इतके करण्याचा विचार अर्थमंत्रालय करत आहे.
याशिवाय या योजनेत नोंदणीसाठी असलेली वयाची मर्यादा वाढवून ५० वर्षे करण्याचाही विचार केला जात आहे. सध्या योजनेनुसार असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा फायदा दिला जात आहे.
यामध्ये १८ ते ४० वर्षांपर्यंतच्या लोकांना १००० ते ५००० रुपये यादरम्यान किमान मासिक निवृत्तीवेतन मिळत आहे.