युनायटेड सिटी हॉस्पीटलमधून उत्तम आरोग्यसेवा मिळेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-शहरातील विविध जाती-धर्माच्या तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांची टीम एकत्र आली आहे. त्यामुळे युनायटेड सिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या माध्यमातून नगरकरांना अत्यंत चांगल्या दर्जाची उत्तम आरोग्यसेवा मिळेल, असा विश्‍वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

युनायटेड सिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आमदार अरुणकाका जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. नगरसेवक गणेश भोसले,

अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, माजी उपमहापौर नजीर शेख, संजय चोपडा, रफिक मुन्शी, प्रॉमिनंटचे जावेद शेख, उबेद शेख यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील टीम यावेळी उपस्थित होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, युनायटेड सिटी हॉस्पीटलने 70 बेडचे केलेले हॉस्पीटल अत्यंत सुसज्ज व अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे बनविलेले आहे.

त्याचा नगरकरांना चांगला फायदा होईल. रुग्णालय खरे तर मरणाच्या दारात असलेल्यांचा जीवदान देणारे केंद्र असते. येथे कमीतकमी दरात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळतील, अशीच अपेक्षा आहे. करोनाच्या संकटामुळे आरोग्यसेवा कशी असावी, ती किती गरजेची आहे. हे जगाला शिकविले.

त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आता वैद्यकीय क्षेत्रात अमुलाग्र बदल केले आहेत. विशेषत: शिक्षण क्षेत्रात गरजेच्या अनुषंगाने ते बदल प्रस्तावित आहेत, अशी भूमिकाही पवार यांनी व्यक्त केली. आमदार संग्राम जगताप यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या.

युनायटेड मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलमुळे नगरकांना आरोग्यसेवेची मोठी उपलब्धी झाली आहे. एकाच छताखाली सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने सामान्य रुग्णांचा येथे खूप फायदा होईल, असे ते म्हणाले. मेडिकल डायरेक्टर डॉ. इम्रान शेख यांनी प्रास्ताविक केले.

सर्वोत्तम उपचारांची हमी अन् सेवेसाठी आम्ही तत्पर राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. पाच वर्षांपासून युनायटेड सिटी हॉस्पिटल नगरकरांना उत्तम आरोग्य सेवा देत आहे. त्याचा हजारो रग्णांना फायदा झाला असून, युनायटेडच्या वैद्यकीय सेवेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती डॉ. शेख यांनी दिली.

डॉ. पियुष मराठे यांनी आभार मानले. डॉ. रोहन धोत्रे, डॉ विनील शिंदे, डॉ. प्रशांत तांदळे, डॉ. आकाश दांगट, डॉ. अमोल कासवा, डॉ. अतुल गुगळे, डॉ. सुवर्णा होशिंग, डॉ. धनंजय वारे, डॉ. आसाराम भालसिंग, डॉ. महेश घुगे,

डॉ. कृष्णा कलवानी, डॉ. शशांक मोहोळे, डॉ. स्नेहलता सायंबर, डॉ. दीपाली फाळके, डॉ. दिलीप फाळके, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. चंद्रकांत शिरसूल , डॉ. विद्याधर त्रंबके, डॉ. चंद्रकांत केवळ, डॉ. शबनम शेख, डॉ. संजय आसनानी, डॉ. शीतल तांदळे, डॉ. सुशील नेमाणे आदी यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts