अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाआघाडीला भरभरून यश दिल्याबद्दल आणि भाजपचा सुपडा साफ केल्याबद्दल कर्जत, जामखेड व नगर जिल्ह्यातील जनतेचे विशेष आभार मानतानाच, मी उपमुख्यमंत्री असेपर्यंत नगर जिल्ह्यााला झुकते माप देणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे केले.
सृजन शासकीय योजना महाराजस्व आभियान शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहीत पवार,
राजेंद्र पवार, आमदार सुधीर तांबे, आ. लहू कानडे, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाअध्यक्ष राजेद्र फाळके यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
यावेळी कर्जत तालुक्यातील शासनाच्या विविध विभागातील योजनांच्या पात्र लाभार्थीना लाभ वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते झाला. माझ्यासह महाआघाडीच सर्व मंत्री आणि आमदार यांचे डोक्यात सत्तेची हवा जाणार नाही आम्ही जनतेसाठी काम करू कायम जमिनीवर राहू
आणि शेतकरी महिलांसह सर्व घटकांसाठी काम करू तसेच राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये एनआरआयसी सह कोणताही कायदा लागु होणार नाही मुख्यमंत्री देखील या कायद्याच्या विरोधात आहेत, असे यावेळी अजितदादांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षेबद्दल लवकरच कठोर कायदा करणार अशी माहिती दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com