महाराष्ट्र

Upcoming Ev Car : मस्तच ! MG एप्रिलमध्ये लॉन्च करणार दमदार कार, एका चार्जमध्ये धावेल 300 किमी; जाणून घ्या कारविषयी

Upcoming Ev Car :जर तुम्ही MG चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्युज आहे. कारण कंपनी एप्रिलमध्ये बाजारात एक Comet EV लॉन्च करणार आहे.

ही कार एका पूर्ण चार्जमध्ये 300 किलोमीटर धावेल. कारमध्ये 20-25kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. ज्याची 68hp पॉवर जनरेट करण्याची क्षमता आहे.

10 लाखांपेक्षा कमी किंमत

मिळालेल्या माहितीनुसार, भारताबाहेर कंपनीने ही कार Wuling Air या नावाने लॉन्च केली आहे. भारतीय कार बाजारानुसार त्याची किंमत 10 लाखांपेक्षा कमी ठेवली जाण्याची शक्यता आहे.

सध्या कंपनीने लॉन्चची तारीख ठरवलेली नाही. याआधी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा यांनी सांगितले होते की कंपनी दुसऱ्या तिमाहीनंतर आपली इलेक्ट्रिक कार सादर करेल. एमजी ब्रँडिंग अंतर्गत कारला चार्जिंग पोर्ट, ड्युअल-टोन बंपर, व्हर्टिकल स्टॅक केलेले हेडलॅम्प, एलईडी डीआरएल इंटिग्रेटेड टर्न इंडिकेटर मिळेल.

5 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध

ही कार पांढरा, निळा, पिवळा, गुलाबी आणि हिरवा अशा एकूण 5 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. कारला अलॉय व्हील विंडो लाइन आणि बॉडीवर कॅरेक्टर लाइन्स मिळतील.

कारची लांबी 2.9 मीटर आहे आणि तिचा व्हीलबेस 2010mm आहे. कारमध्ये 10.25-इंच स्क्रीन दिली जाईल. कारमध्ये कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ड्युअल टोन इंटिरियर्स, व्हॉईस कमांड्स, वायरलेस ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो आणि सनरूफ सारखी वैशिष्ट्ये असतील.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts