UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.
UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : रांजणगाव येथील गणपती कोणत्या नावाने ओळखला जातो?
उत्तर : महा गणपती
प्रश्न : राणी लक्ष्मीबाई वयाच्या कितव्या वर्षी वीरमरण पावल्या होत्या?
उत्तर : २९ व्या वर्षी राणी लक्ष्मीबाई वीरमरण पावल्या होत्या.
प्रश्न : भारत व चीन या दोन देशात दरम्यान कोणता युद्धसराव आहे?
उत्तर : मित्रशक्ती
प्रश्न : स्वातंत्रवीर सावरकर यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती?
उत्तर : मित्रमेळा संघटना
प्रश्न : कोणत्या पक्षाच्या सदस्यांना बोट कापून शपथपत्रावर स्वाक्षरी करावी लागते?
उत्तर : फॉरवर्ड ब्लॉक सदस्यांना बोट कापून शपथपत्रावर स्वाक्षरी करावी लागत होती.
प्रश्न : महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री कोण बनले होते?
उत्तर : मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत.