ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व असलेली संस्था आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना येतात त्या समाजातील खालच्या थरापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम ग्रामपंचायत करते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला तर यामध्ये राज्य सरकार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि शेवटचा घटक हा ग्रामीण स्तरावरील ग्रामपंचायत येतो.
त्यामुळे राज्य सरकारच्या सगळ्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण स्तरावर जर विचार केला तर प्रामुख्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही भारतातील दारिद्र्य निर्मूलन आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची योजना किंवा माध्यम मानले जाते.या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये जे काही नागरिक राहतात त्यांना शाश्वत अशा उपजीविका देण्याच्या दृष्टिकोनातून आणि ग्रामीण गरिबांचे जीवनमान सुधारणे आणि ग्रामीण भागातील गरिबी आणि बेरोजगारीचे उच्चाटन करण्याच्या दृष्टिकोनातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवण्यात येते.
साधारणपणे 2005 मध्ये भारतीय संसदेने मनरेगा योजनेला मंजुरी दिली व सुरुवातीला देशातील दोनशे जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली ही योजना त्या ठिकाणी यश मिळाल्यानंतर आता संपूर्ण ग्रामीण जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागामध्ये मनरेगाच्या अंतर्गत अनेक योजना राबवल्या जातात व त्यांचे कामे सुरू असतात.
परंतु बऱ्याचदा आपल्याला आपल्या गावामध्ये मनरेगाच्या कोणत्या योजना सुरू आहेत हे कळत नाही. त्यामुळे या लेखात आपण ऑनलाईन पद्धतीने घरी बसून तुम्ही कशा पद्धतीने मनरेगा वेबसाईटवर जाऊन तुमच्या गावात सुरू असलेल्या मनरेगाची कामे पाहू शकतात याबद्दलची माहिती घेऊ.
ऑनलाइन पद्धतीने अशा पद्धतीने पहा तुमच्या गावातील ग्रामपंचायतीच्या सुरू योजना
1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला https://nrega.nic.in/ या वेबसाईटवर जावे लागेल.
2- त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला ग्राम पंचायत या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3- त्यानंतर तुम्हाला यादी पाहण्यासाठी जनरेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पेज ओपन होईल व त्या ठिकाणी तुमचे राज्य निवडायचे आहे.
5- त्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षाचे योजनेची कामे पाहायचे आहेत त्याचे निवड करावी.
6- त्यानंतर जिल्ह्याच्या यादी मधून तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाची निवड करावी.
7- त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायतीचा डॅशबोर्ड दाखवला जातो व त्या ठिकाणी तुम्हाला कोणती योजना पहायची असेल तिची निवड करावी.
8- समजा तुम्ही वर्ष 2023-24 या वर्षाची निवड केली त्यापुढे तुम्हाला त्या गावासाठी असलेले योजनांची यादी बघायला मिळेल.
9- या यादी मधून जर तुमच्या काही कामाची योजना सुरू असेल तर तुम्ही त्याचे संपूर्ण माहिती वाचून त्यावर अर्ज करा व त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या आहेत काही केंद्रशासन पुरस्कृत ग्रामपंचायत विकास योजना
आपण केंद्र शासनाच्या ग्रामपंचायत विकास योजना पाहिल्या तर यामध्ये कायमस्वरूपी विक्री केंद्र बांधने तसेच राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम, महालक्ष्मी सरस प्रदर्शन, दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, महिला किसान सशक्तिकरण कार्यक्रम, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनशैली मिशन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय ग्रामस्वराज्य योजना तसेच सामाजिक,आर्थिक व जात सर्वेक्षण इत्यादी केंद्र पुरस्कृत योजना आहेत.
राज्य पुरस्कृत ग्रामपंचायत विकास योजना
राज्य पुरस्कृत ग्रामपंचायती विकास योजनांची यादी पाहिली तर यामध्ये वित्त आयोग, स्मार्ट ग्राम योजना, ग्रामपंचायतींना जन सुविधांसाठी विशेष अनुदान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम इत्यादी योजना सांगता येतील.